नियमांचे पालन न करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कडक कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोल्हापूर (वृत्तसंस्था) खासगी रुग्णालय पेशंटना तपासात नाहीत अशा तक्रारी येत आहेत. असे करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास कडक करावाई करण्यात यईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

 

राजेश टोपे पुढे म्हणाले की, सर्व सरकारी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर उपचार करत असतांना खासगी हॉस्पिटल्सनांही सरकारने काही नियम घालून दिले आहेत. खासगी रुग्णालय पेशंटना तपासात नाहीत अशा तक्रारी येत आहेत. असे करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास कडक करावाई करण्यात यईल असा इशाराही त्यांनी दिला. खासगी हॉस्पिटल्सनी अंटीजन कीट ठेवल्या पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्याची गरज लक्षात घेऊन सरकार नव्या ५०० रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content