नियमांचे उल्लंघन; फैजपुरात शॉपिंग मॉलला ठोकले सील

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई प्रांताधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी शनिवारी केली आहे.

शुक्रवारी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी शहरातील एक कापड दुकान व ब्रांडी हाऊस वर नियमाचे उल्लंघन केल्याने सील ठोकले होते. त्यानंतर व्यवसायिक व नागरिक काहीतरी धडा घेतील असे वाटत असतानाच बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉल मध्ये आज ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. तसेच याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी किशोर चव्हाण व पालिकेचे कर्मचारी यांनी धडक भेट देऊन मॉलला सील करण्याची कारवाई केली अशी माहिती स्वतः मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.

Protected Content