जळगाव, प्रतिनिधी | निमजाई फाउंडेशतर्फे दरवर्षी गोर-गरीबांना अन्नदान, निराधारांना निवासाची सोय, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदा आशादीप वसतिगृहातील महिलांची संक्रांत गोड व्हावी व त्यांना आनंद मिळावा यासाठी त्यांच्यासोबत हळदी-कुंकू साजरे करणार असल्याची माहिती अध्यक्षा शीतल पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
फाउंडेशनतर्फे बाल निरिक्षण गृहातील मुले तसेच आशादीप वसतीगृहातील महिला या सण, आनंदापासून वंचित असतात. त्यांना आनंद मिळावा भावेनेतून उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाच्या बेटी बचावो बेटी पढाओ या मोहिमेला हातभार लावाला यामाध्यमातून शासनाच्या कौशल्य विकास अंतर्गत त्यांना विविध प्रकारचे कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे, तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर संबंधित महिला तसेच तरुणी रोजगारक्षम बनाव्यात या उद्देशातून फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. यात केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास या योजनेनुसार फाउंडेशन अंतर्गत महिला तसेच तरुणींसाठी लाखो रुपये फी असलेले फॅशन डिजाईनिंग, ब्युटी पार्लर तसेच हार्डवेअर या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी पत्रकार परिषदेस निमजाई फाउंडेशनचे सचिव भूषण बाक्षे, समन्वयक दिपक जावळे उपस्थित होेते.