जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी शिवारात बेकायदेशीर चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कारवाई करत एका ट्रक्टरवर करवाई करत वाहतूकीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील गिरणानदीपात्रातून सर्रासपणे बेकायदेशीर वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. गेल्या आठवड्यात सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी अवैध वाळूच्या साठ्यावर मोठी कारवाई केली होती. यात वाळूचे मोठे साठे जप्त करण्यात आले होते. ही कारवाई ताजी असतांना १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमखेडी शिवारातील गिरणानदी पत्रात आणि नदीच्या लगतच्या रोडवरून ट्रक्टरच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाईसाठी दाखल होवून रस्त्यावर बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ५६५२) आणि ट्रॉली क्रमांक (एमएच १९ एएम ८८४०) कारवाई करण्यात आली असून ट्रक्टर जप्त करण्यात आले आहे. कारवाई करत असतांना ट्रक्टरवरील अनोळखी तरूण ट्रक्टर सोडून पळ काढला. तर सोबत असलेल्या संशयित आरोपी आनंद सपकाळे रा. आव्हाणे ता.जि.जळगाव याला ताब्यात घेतले. दोघांवर पोलीस कर्मचारी भुषण रोंदळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे.