तरूणाच्या खिश्यातील मोबाईल हिसकावून दोघे पसार

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भाऊंचे उद्यानासमोर उभा असलेल्या तरूणांच्या खिश्यातून अज्ञात दोन भामट्यांनी धुमस्टाईल मोबाईल लांबविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विकास सैय्यद जब्बार सैय्यद (वय-३०) रा. रूबी अपार्टमेंट, डी-मार्ट समोर हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शनिवार असल्यामुळे ते घरीच होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते मुलांना घेवून भाऊंचे उद्यानात नाना नानी पार्कमध्ये घेवून गेले. बराच वेळ झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले, उद्यानासमोर दुकानावर शेंगदाणे व फुटाणे घेण्यासाठी रात्री ९.३० वाजेला थांबले होते. त्याचेवळी दुचाकीवर अज्ञात दोन जणांनी येवून त्यांच्या खिश्यातील ५ हजार रूपयं किंमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून विकास सैय्यद यांना ढकलून दिले. विकास सैय्यद यांना आरडाओरड देखील केली मात्र तोपर्यंत दोन्ही भामटे दुचाकीवरून महाबळकडे पसार झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत होते.

Protected Content