जळगाव प्रतिनिधी । रस्ता क्रॉस करतांना भरधाव दुचाकीच्या धडकेत जळगाव येथील प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे घडली होती. जळगाव येथील खासगी रूग्णालया उपचार घेत असतांना गुरूवारी २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीधारकावर निफाड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक सुकदेव पांढरे (वय-५२) रा.लाखनवाडी ता. खामगाव जि. बुलढाणा ह. मु. श्रीराम नगरदादावाडी, जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, दिपक पांढरे हे चालक आहे. कंपनीचा माल जिल्हाबाहेर नेण्याचे ते काम करतात. यासाठी त्यांचा मुलगा सचिन पांढरे हा देखील मदत करतो. त्यासाठी त्यांच्याकडे आयशर (एमएच १९ झेड ३६४१) क्रमांकाची वाहन आहे. दिपक पांढरे यांनी जळगावातील आनंद हार्डवेअर दुकानाचे माल भरून ठाणे येथे नेवून खाली करण्याचे काम घेतले होते. ठाणे येथे माल खाल करून २३ डिसेंबर रोजी रोजी निफाळ मार्गे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले. रात्री ८ वाजेच्या सुमारास निफाळगावाजवळ असलेल्या जयभोले ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले. रस्ता ओलांडून हॉटेलात जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १५ बीएफ ४१३७) क्रमांकाच्या दुचाकीने दिपक पांढरे यांना जोरदार धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना २६ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान दिपक पांढरे यांचा मत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीधारक वसंत जगन्नाथ खंडागळे रा. सई ता. निफाळ जि. नाशिक याच्याविरोधात निफाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी सुलाबाई, मुलगा सचिन, पुजा आणि शितल या दोन मुली असा परिवार आहे.