विठ्ठल पेठेतून व्यावसायिकाची मोटारसायकलची चोरी

शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विठ्ठल पेठ परिसरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी व्यवसायिकाची १० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुनिल अशोक शोकोकर (वय-३७) रा. डीएनसी कॉलेज जवळ, ओम नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते खासगी व्यवसायीक असून त्यांचे विठ्ठलपेठेत रिपेअरींचे दुकान आहे. रिपेअरिंगचे काम करण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एसी २८४८) क्रमांकाची मोटारसायकल आहे. १० जून रोजी रात्री त्यांनी विठ्ठल पेठेतील गणेश रेफ्रिजरेटर दुकानासमोर मोटारसायकल पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले. चार दिवस मोटारसायकलचा शोध घेतला परंतू मोटारसायकल मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १४ जून रोजी दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!