जळगाव, प्रतिनिधी । निखिल एकनाथराव खडसे यांच्या जयंतीनिमित्ताने आज ३१ डिसेंबर रोजी नाथ फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात ब्लॅंकेट व सॅनिटायझर मास्क व तापमान मोजणी यंत्राचे वाटप करण्यात आले.
जळगाव मनपा मूकबधिर विद्यालयात गोरगरिबांना व अंध व दिव्यांग बांधवांना नाथ फाउंडेशनतर्फे ब्लॅंकेट व सॅनिटायझर मास्क व तापमान मोजणी यंत्रचे वाटप करण्यात आले. स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या आठवणींना उजाळा देत नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, अशोक पाटील, वाय. एस. महाजन सर, सुनील माळी, दीपक फालक, दिलीप माहेश्वरी, ललित शर्मा, युसूफ पिंजारी, कुणाल बागुल, भला तडवी, दीपक सोनवणे, सचिन पाटील, गोपाळ हटकर, बापू पारधी, गणेश निकुंभ, पवन हटकर, धनराज मराठे, योगेश लाडवंजारी आदींची यावेळी उपस्थिती होती. यासोबत नाथ फौंडेशनतर्फे जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथेही महिला रुग्णांना सॅनिटायझर, माक्स व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/683247752291635