निंभोरासिमच्या कोरोनाच्या तांडवाला अंत्यसंस्कार कारणीभूत

 

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरासीम येथील एका कोरोना पॉझिटीव्हचा जळगाव येथे नेत असतांना मृत्यू झाला होता. त्यानंतर मृताच्या नातलगांनी ग्रामीण रुग्णालयात न नेता  परस्पर अंत्यसंस्कार केले.  प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे गावात आतापर्यंत १३ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे.

कोरोनाने तालुक्यात तांडव करायला सुरुवात केली आहे. रोजचे रिपोर्ट बघुन प्रशासन जनता सर्वच टेंशनमध्ये आले आहे. एकट्या निंभोरासिममध्ये तब्बल १३ जण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. याला निव्वळ अंत्यसंस्कार कारणीभूत ठरले आहे. यानंतर आरोग्य विभागाने गावातील ७२ जणांना क्वोरोंटाईन केले असून यापैकी हाय-रिक्स असलेल्या ३७ जणांचे स्वॅब आरोग्य प्रशासनाने घेतले आहे.

अंत्यसंस्कारला गर्दी जमण्यास जिल्हाधिका-यांचा होता मज्जाव

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे जिल्हात कुठेही अंत्यसंस्कार करायला फक्त २० लोकांना परवानगी दिली होती. परंतु, निंभोरासिम येथिल ५२ वर्षीय कोरोना पोझिटीव्ह पेशंटच्या अंत्यसंस्कारमध्ये यापेक्षा जास्त लोक होते. यामुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशला येथेच केराची टोपली दाखवली गेली. परीणामी म्हणून गावात कोरोना’चा तांडव सुरु झाला नंतर प्रशासनाला उशिरा सूचलेल्या शहाणपणातून अंत्यसंस्कारमध्ये सहभागी झालेले २७ लोकांवर गुन्हे दाखल केले.

असा झाला घटनाक्रम

निंभोरासिम येथे दि. २३ रोजी ५२ वर्षीय व्यक्तीला श्वास,ताप, व खोकल्याचा त्रास होता. त्यांच्या मुलाने त्यांना मुक्ताई नगर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेऊन पुढील उपचारासाठी जळगाव येथे  पुढील उपचारार्थ हलवण्यात येत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.  यानंत नातेवाईकांनी  मृतदेह ग्त्यांरामीण रूग्च्याणालयात न नेता राहत्या घरी निंभोरासिम येथे आणला. त्यानंतर त्यांच्यावर पारंपारीक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये त्यांचे सर्व नातलग व गावातील काही लोक सहभागी झाले होते. नंतर या मयत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव आल्याने आरोग्य प्रशासन खळबळुन जागे झाले. तोपर्यंत खुप उशीर झाला होता. गावात कोरोनाने त्याचा तांडव दाखवण्यास सुरुवात केली होती.

Protected Content