खंडवा लोकसभा पोटनिवडणुक : ज्ञानेश्वर पाटलांचा ८१ हजार मतांनी विजय

रावेर प्रतिनिधी । खंडवा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी काँग्रेसचे राजनारायण सिंह पुराणिक यांचा ८१ हजार मतांनी पराभव केला आहे. मतमोजणी सुरू असताना भाजपचे उमेदवार सातत्याने आघाडीवर होते. ज्ञानेश्वर पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप नेत्यांनी सर्वत्र जल्लोष केला.

21व्या फेरीत 42,000 मतांच्या निर्णायक आघाडीमुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. खंडवा येथील भाजप उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी दादाजींनी दरबारात पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेतले.  मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचल्यावर ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

आठ विधानसभा मतदारसंघांचा असलेला खंडवा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या सीमेपासून ते थेट इंदूर च्या देवास पर्यंत विस्तारलेला असून यात बऱ्हाणपूर व नेपानगर या दोघा विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारांपेक्षा जास्त मते मिळाल्याने ही मते निर्णायक ठरली असुन जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार असल्याने त्याचा फायदा न्यानेश्वर पाटील यांना झाल्याचे बोलले जात आहे.

 

 

Protected Content