याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश रमेश पवार (वय-२४) रा. फाफोरे बुद्रुक ता.अमळनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार १ जून रोजी दुपारी त्याच्या शेतात निंबाचा झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. सचिन मोहन जाधव यांच्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील ताास पोलीस नाईक कैलास शिंदे करीत आहे.
निंबाच्या झाडाला गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
3 years ago
No Comments