‘त्या’ तरूणाची हत्या करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शरथ नगरात राहणारा सौरभ चौधरी यांचा भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीजवळ मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला कानळदा शिवारातून अटक केली आहे. उसनवारीच्या पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दशरथ नगरात राहणारा मयत सौरभ यशवंत चौधरी (वय-२३) याचा जळगाव तालुक्यातील भादली-कानसवाडा रस्त्यावर ३ ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील अज्ञात मारेकरी हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोउनि अमोल देवळे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे , जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप साळवे, रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, रमेश जाधव यांनी गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी गोपनिय माहितीच्या आधारे कारवाई करत संशयित आरोपी ईश्वर नथू सपकाळे रा. कानळदा ता. जि.जळगाव याला गुरुवार ६ ऑक्टोबर रोजी कानळादा शिवारातून अटक केली आहे. हात उसनवारीने मयत सौरभ चौधरी यांच्याकडून पैसे घेतले होते. पैसे परत मागण्याच्या त्रासातून भादली येथे सौरभला बोलावून संशयित आरोपी ईश्वर सपकाळे याने जवळ असलेल्या लोखंडी रॉड सौरभच्या डोक्यात टाकून खून केला होता अशी कबुली दिली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content