निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली येथील ४२ वर्षीय व्यक्तीने निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सुभाष चावदस लासूरे (वय-४२) रा. धनगरवाडा, चिखली खुर्द ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विवंचणेत होते. शनिवार २३ एप्रिल रोजी सायंकाळी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. त्याच्या कुटुंबियातील सदस्यांनी परिसरात शोधाशोध केली ते कुठेही आढळून आले नाही. रविवारी २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी शेतातील निंबाच्या झाडाला बागायती रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. त्यांना तातडीने खाली उतरवून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.

 

Protected Content