खानापूर वृत्तसंस्था । तालुक्यातील बोगुर गावानजीक बोगुर इटगी रोडवर असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघात आठ ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यु तर ३० जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सर्व मयत बोगुर गावचे राहणारे असून या अपघाताने अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी आणि भीषण अपघात झाला. खानापूर तालुक्यातील बोगुर गावानजीक बोगुर इटगी रोडवर असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात झाला. ऊसतोड करणारे कामगार ट्रॅकटरमधून इटगी गावनजीकच्या बाहेरील रस्त्यावरून येत होते. यावेळी चालकाचे ट्रॅकटरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.