मुंबई प्रतिनिधी | पेगॅसस सॉफ्टवेअरच्या मदतीने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. थोरात म्हणाले, “नाना पटोले यांचेही फोन 2017-18 मध्ये टॅप झाले होते. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. कारण यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते”
विशेष बाब म्हणजे नाना पटोले यांनी आधीच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. पेगॅसस प्रकरणामुळे यावरून कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.