नांदुरा येथे ‘शासन आपल्या दारी’ महाशिबीर उत्साहात

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत महाशिबिर उत्साहात पार पडले.

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्यादारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासकीय योजना सुलभीकरण अभियान म्हणजेच शासन आपल्यादारी या कार्यक्रमा अंतर्गत तालुका प्रशासन नांदुरा यांचे वतीने दिनांक २६ रोजी सकाळी १०.०० वाजता  हरीभाऊ पांडव, मंगल कार्यालय नांदुरा येथे महाशिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

महाशिबीरात योजना निहाय कार्यालयांनी आपले स्टॉलची उभारणी केली, सदर स्टॉलवर नागरिकांना योजनेसंबधी माहिती व लाभ प्रदान करण्यात आला. सदर महाशिबारामध्ये तहसिल कार्यालय, नांदूरा अंतर्गत संजय गांधी निराधार योजना; श्रावणबाळ निराधार योजना;. इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना; राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना; सेतु विभागाची विविध प्रमाणपत्र; सलोखा योजना; शिधापत्रिका,पंतप्रधान किसान सन्मान योजना, मतदार नोंदणी या विषयाअंतर्गत एकुण ३६४६ लाभार्थी यांना योजनेचा लाभ देण्यात आला.

 

पंचायत समिती नांदुरा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना; रमाई आवास योजना; शबरी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन अप्पा ( वैयक्तीक शैचालय);  म.ग्रा.रा.ग्रा.रो.ह.योजना; शोषखड्डा ; गुरांचा गोठा ; शेळी शेड;  कुकुट पालन , फळबाग या विषयाअंतर्गत एकुण ५१४२ लाभार्थी यांना योजनेचा लाभ देण्यात आला.

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नांदुरा अंतर्गत शिलाई मशिन, पिठाची चक्की योजना, माझी कन्याभाग्यश्री योजना या विषयाअंतर्गत एकुण ७६० लाभार्थी यांना योजनेचा लाभ देण्यात आला. तालुका कृषी विभाग अंतर्गत १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना; नविन विहीर व जुनी विहीर दुरुस्तीकरणे;  विदयुत पंप संच व विज जोडणी आकार या विषयाअंतर्गत एकुण ३१० लाभार्थी यांना योजनेचा लाभ देण्यात आला.

 

 

तालुका आरोग्य अधिकारी नांदुरा अंतर्गत आरोग्य संबंधी विविध योजना व आरोग्य तपासणी शिबीर, विवाह नोंदणी, जन्म मृत्यु नोंदी व इतर या विषयाअंतर्गत एकुण १८९१ लाभार्थी यांना योजनेचा लाभ देण्यात आला.

 

सदर महाशिबिराचे उदघाटन आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख होते. महाशिबीरास नांदुरा तालुक्यात बहुसंख्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत नांदुरा तालुक्यात दिनांक १५ एप्रिल २०२३ ते आजपर्यत एकुण ११७९९ लाभार्थी यांनी लाभ घेतला. महाशिबीर यशस्वी करीता तालुक्यातील पंचायत, तहसिल, नगर पालिका, आरोग्य, सहकार, कृषी विभाग व पोलीस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.

Protected Content