जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव शिवारातील एका शेतातून महावीतरण कंपनीची अॅल्यूमिनीअमची तार चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, विजवितरण कंपनीने नंदगाव शिवारातील दिलीप वामन सोनवणे यांच्या शेतात २५ हजार रुपये किमतीची १८०० मिटर लांबीची अॅल्यूमिनीअमची तार ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ही तार चोरी केली. तीन जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतमालक सोनवणे यांनी वीज वितरण कंपनीस कळवले. त्यानुसार कनिष्ठ अभियंता राघवेंद्र शंकर कापसे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण अगोने तपास करीत आहेत.