जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील कपाटातील ४० हजार रूपये रोख लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाजीमअली लियाकत अली सैय्यद रा. ताजनगर नशिराबाद ता.जि.जळगाव हे व्यापारीचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वजण गावातील जुन्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी राहत्या घराला कुलुप लावले होते. १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घरी नाजीमअली यांचा भाऊ मुबारकअली सैय्यद हे घरी आल्यावर त्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने घरात पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने घरातील कीचन रूममधील लोखंडी कपाटातून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपये रोख चोरून नेल्याचे दिसून आले. नशिराबाद पोलीसांनी चोरी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. नाजीमअली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.