नशिराबाद येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी; चार जखमी, सहा जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे जुन्या वादातून रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहे. यात सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, नशिराबाद शहरातील इंदीरा चौकात ३ जुलै २०२१ रोजी रात्री ८.३० ते ८.४५ वाजेच्या दरम्यान जुन्या वादातून गुरांच्या मांस पकडल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामुळे नशिराबाद शहरातील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात लाकडी दांडके, लोखंडी आसारी आणि दगडा वापर करण्यात आला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत छोटू भिका भाई (वय-४०), चेतन छोटू भोई, मजाबाई अशोक भोई आणि विनायक मोतीराम भोई  सर्व रा. नशिराबाद ता.जि.जळगाव हे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

 

छोटू भोई यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुस्ताक शेख मुसा कुरेशी, शेख अनिस शेख हसन, साजीदखान दाऊदखान, जुबेर खान सलीम खान, नुरमोहम्मद शेख मुस्ताक, मोहम्मद रईस शेख महेबुब, अय्युबखान दाऊदखान, शोएब शेख गुलाम, असलखान अय्याजखान, गफुरखान अहमदखान, बाली उर्फ अख्तरखान रज्जाकखान, रहिम हारून मिस्तरी, अज्जू अल्ताफ खाटीक, शेख नासीर शेख सलीम बऱ्हाणपुरी, पिरमोहम्मद शेख मुस्ताक, बबलु रहिम (रिक्षावाला), हनिफ अफजलोद्दीन (बटाटेवाला), अजीज, बशीर (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह अजून ७ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या पथकाने धरपकड करत सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content