जळगाव प्रतिनिधी । न्यायालयात जात असलेल्या तरूणाला गावातील चार ते पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना आज नशिराबाद येथील बसस्थानकाजवळ घडली. जखमी अवस्थेत तरूणाला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रमोद रामदास सोनार (वय-35) रा. नशिराबाद हा जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल रिपेअरींगचे काम करतो. आज त्याला जिल्हा न्यायालयात काम असल्यामुळे सकाळी १० वाजता घरातून जळगावला जाण्यासाठी निघाला. नशिराबाद बसस्थानकाजवळ बसची वाट पाहत असतांना अचानक चार ते पाच जणांनी प्रमोद सोनारला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला मारहाण का केली हे समजू शकले नाह. जखमी आवस्थेत त्याला भाऊ व आई यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.