नशिराबाद लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : नशिराबाद शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नशिराबाद नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना मंगळवारी ६ जून रोजी सकाळी ११ वाजता निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, शहराच्या आजूबाजूला असलेल्या पाणी श्रोतातून शहराची तहान भागेल इतक्या पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतांना नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाघूर धरणावरील बेळीगावात असलेली पाणीपुरवठा योजना, तसेच मुर्दापूर धरणा जवळील पाणीपुरवठा योजना आणि या भागात विहिरीवरून येत असलेले पाण्याचे स्रोत नशिराबाद गावातील नागरिकांना पाणी पुरवू शकतात. शिवाय शेळगाव येथून केलेली पाणीपुरवठा योजना निव्वळ विजेच्या थकबाकीपोटी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईवरून मोठे हाल सोसावे लागत आहे. नागरिकांना १२ दिवस पाण्याचे वाट पहावी लागत आहे. या सर्व परिस्थितीला नशिराबाद नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे शेळगाव येथील पाणीपुरवठा योजना सुरू करून नशिराबाद शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली होती परंतु नशिराबाद येथील प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेतल्याने मंगळवार ६ जून रोजी सकाळी ११ वाजता नशिराबाद नगरपरिषदेच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घागर मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी पंकज महाजन, बरकत अली, विनोद रंधे, शे अय्युब शे मिया, देवेंद्र पाटील, विनायक धर्माधिकारी, नजर अली, इमाम खान, जगन पैलवान, बंडू रत्नपारखे, अनिल सोनार, शेख राउफ शेख गनी, समद अली, शेख, मुस्ताक ठेकेदार, कलीम अली, शेखर पाटील, कल्पेश पाटील, चंद्रकांत पाटील, निलेश रोटे, पूर्वेश येवले, भोजराज पाटील, ललित रोटे, यांच्यासह आदी उपस्थित होते