नवी मुंबई महावितरणचे कार्यालय मनसेसैनिकांनी फोडले !

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईत आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. वाशी सेक्टर १७ मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. वीज प्रश्नावर राज्य सरकारचे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारने करुन घेऊ नये, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

Protected Content