Home राजकीय पंतप्रधान मोदींनी जनतेची माफी मागावी-चाकणकर

पंतप्रधान मोदींनी जनतेची माफी मागावी-चाकणकर


rupali chakankar

मुंबई प्रतिनिधी । वादग्रस्त पुस्तकप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

 

या संदर्भात प्रतिक्रिया देतांना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, आधी नगरचे उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, पाठ्यपुस्तकात जिजाऊ माँसाहेबांचा केलेला अपमान आणि आता ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे प्रकाशन यावरून भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची वृत्ती दिसून येते. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद्र मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.  अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी भाजपाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा सुद्धा रूपाली चाकणकर यांनी याप्रसंगी दिला.


Protected Content

Play sound