जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेतला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नवनियुक्त पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांना पदाभार सोपविला. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन,अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयी माहिती डॉ. मुंढे यांना डॉ.उगले यांनी दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम केले जाणार आहे. गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक राखण्याचे ध्येय राहणार असल्याचे डॉ. मुंडे यांनी सांगितले..
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/772016440317533/