पाचोरा प्रतिनिधी । मागील वर्षापेक्षा या वर्षाचा पाऊस कमी प्रमाणात आहे. मागील वर्षी नगरदेवळा ता. पाचोरा येथील अग्नावती मध्यम प्रकल्प धरण २१ जुलै २०२० रोजी १०० टक्के भरले होते. मात्र या वर्षाच्या पर्जन्यमान कमी झाल्यामुळे अग्नावती मध्यम प्रकल्प धरण भरलेले नाही.
मराठवाड्यातील किन्ही (ता. सोयगाव) जवळील धरणाचे पात्र १०० टक्के पुर्णपणे भरल्यामुळे अग्नवती मध्यम प्रकल्प नगरदेवळा येथील धरणाच्या पात्रात पाण्याची आवक वाढत आहे. दि. २६ आॅगस्ट २०२१ रोजी अग्नावती माध्यम प्रकल्प धरणातील पाण्याची पातळी – २९५.००, उपयुक्त साठा – ०.३०९१ व ११.२० टक्क्यांनी भरलेले आहे. तरी दिवसेंदिवस अग्नावती मध्यम प्रकल्प धरणाच्या पात्रात पाण्याची पातळीत वाढ होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पूर्तता झाली असून पिकांची स्थिती आता समाधानकारक झाली आहे. तरी दमदार पावसाची मात्र अजूनही अपेक्षेपुर्ण प्रतिक्षा आहे.