नक्षली आवाहनाचा फार विचार करण्याची गरज नाही — दिलीप वळसे पाटील

 

पुणे : वृत्तसंस्था । नक्षली चळवळ व्यवस्थेच्या विरीधात असल्याने मराठा आरक्षणाच्या संदर्भाने त्यांच्या आवाहनाचा फार विचार करण्याची गरज नाही , असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे 

 

नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. तसं पत्रकही सध्या चर्चेत आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हे पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.

 

नक्षली चळवळ व्यवस्थेच्या विरोधातील आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात जी लोकं काम करतात त्यांनी अन्य लोकांना तुम्ही आमच्यात या, संघर्ष करा असे सांगणे म्हणजे देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्यासारखे किंवा धोका निर्माण करण्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांच्या  आवाहनाचा फार विचार करण्याची गरज नाही. आपल्या लोकशाही राज्यात राज्यघटना, सरकार, न्यायालय या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत.असेही ते म्हणाले

 

नक्षलवादी चळवळीकडून मराठा समाजातील तरुणांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी आज मत मांडलं आहे.

 

“मराठा समाजातील मूठभर दलाल, भांडवलदार मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळय़ांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्याकरिता मैदानात उतरावे. भारतीय क्रांतीचा विजय करण्याकरिता क्रांतीला अभिप्रेत असलेल्या विचारांनी आपली ताकद मजबूत करा. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत असून तुमची वाट पाहत आहे.”, असे म्हणत माओवादी राज्य समिती सचिव सहय़ाद्री याने मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा असल्याचे म्हटलेले आहे.

 

Protected Content