नंदुरबारच्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील १५ जखमी

नंदुरबार वृत्तसंस्था । धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे.

जळगावहुन सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस प्रवासी घेऊन सुरतकडे निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस कोंडाईबारी घाटात आल्यानंतर दर्ग्या जवळील घाटात असलेल्या सुमारे चाळीस फूट दरीत ती कोसळली. हा अपघात कसा झाला. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नाही. जळगावहून सुरतकडे जात असताना बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील दर्ग्या जवळील पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

जखमी व्यक्तींची नावे
सैय्यद हरून सैय्यद समत (वय-३४) जळगाव, कान्हीलाल बाबुला बागुल (वय-३५), साक्री, धुळे, सय्यद हरुण सय्यद संमत (वय-३४), सय्यद रियान सय्यद हरून (वय-१५), आयुब खान सांडे खान वय 55, समाधान सचिन पाटील (वय 28) सर्व रा. जळगाव, मुकेश रामचंद्र खाटीक (वय-३७), नाशीर खान सुभान खान (वय-३४) रा. सुरत, शांताराम किसन धनगर (वय-३८), निलेश शांताराम धनगर (वय-२२) रा. भादली ता. जि.जळगाव, फारुख शेख गणी (वय-५२) रा. सुरत, सय्यद जोया सय्यद हरून (वय-१८), कुरशीनबी सांडे खान (वय-७०), अफसाना सय्यद (वय-३२), अख्तरबी आयुब खान (वय-६०) सर्व रा. जळगाव , रेखा समाधान पाटील (वय-२६), उशा शांताराम धनगर (वय-४०) रा. भादली ता.जि.जळगाव , पुष्‍पाबाई विलास पाटील (वय 50) सुरत, भाग्यश्री समाधान पाटील (वय २), प्रिया समाधान पाटील (वय-९) रा. जळगाव रोशनी अमर बारी (वय-२४) रा. सुरत, जयेश भानुदास वाघोदे (वय 28) जळगाव, उर्वशी विनोद पाटील (वय 10) सुरत, शोभा अनिलसिंग (वय 48) भादली ता.जि.जळगाव, अनिल सदानंदसिंग (वय-५२) भादली, शेख नाजियाबी सलार (वय 35) आणि शेख खलील शेख इसा (वय-५५) रा. सुरत अशी जखमींची नावे आहेत. यात १५ जण जळगाव जिल्ह्यातील आहेत.

अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे विसरवाडी, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, पिंपळनेर, दहिवेल येथील १०८ रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले असून उपचारासाठी तातडीने विसरवाडी रुग्णालयात हलविण्याचे काम रुग्णवाहिकांद्वारे सुरू आहे.

Protected Content