नंदिग्राममधून ममता बॅनर्जी विजयी !

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्या पिछाडीवर  होत्या  नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.

 

सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर भाजपाची मात्र १०० च्या पुढेही जाताना दमछाक होण्याची शक्यता आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत.  कोरोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  या  राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

 

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागलं. २४९ जागांच्या विधानसभेत १४७ चा मॅजिक फिगर कोण मिळवणार याची आता उत्सुकता आहे

 

Protected Content