जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून अपात्कालीनी खिडकीतून तोल गेल्याने साडेतीन वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, विनायक शिवकुमार मिश्रा रा. नवापूर, जि. जोहनपूर (उत्तर प्रदेश) ह.मु. बोरीवली मुंबई यांचे गावाकडे नातेवाईकांकडे लग्न असल्याने त्यांच्या पत्नी पिंकी मिश्रा आणि मुलगा विनायक शिवकुमार मिश्रा (वय-साडेतीन वर्ष) गावाकडे नातेवाईकांसोबत गेले होते. लग्न आटोपून पुन्हा मुंबईला येण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी १२१६८ वाराणसी लोकमान्य टिकळ गाडीत बसले. रेल्वे गाडी आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास भादली रेल्वे स्थानकाजवळून जात असतांना मुलगा विनायक मिश्रा हा आई पिंकी यांच्या सोबत रेल्वे डब्याच्या अपात्कालिन खिडकीजवळ बसले होते. यावेळी मुलगा विनायक याने फ्रुटी हे थंडपेय मागण्याचा हट्ट धारला होता. त्यावेळी अपात्कालिन खिडकी पुर्णपुणे उघडी होती. पिंकी बॅगेत असलेली बाटली घेण्यासाठी उठली असता त्यावेळी मुलगा विनायक हा खिडकीजवळ उभा होता. काही समजण्याच्या आत त्याचा तोल जावून खिडकीतून धावत्या रेल्वे खाली पडला. मुलगा पडल्याने आई पिंकी यांच्या लक्षात आल्याने तीने आरडाओरड केली. रेल्व डब्यातील तरूणांनी तातडीने चैन ओढून रेल्वे थांबविली आणि जखमी झालेल्या मुलाला घेतले. रेल्वे पोलीसांच्या मदतीने त्याला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबई येथील खासगी रूग्णालयात रवाना करण्याच्या हालचाली सुरू होत्या. यावेळी जीआरपी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाण्डेय, पो.कॉ.अजय मुंड यांनी मदतीने केले.