डॉ. तडवी आत्महत्या : तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना ‘शिक्षणबंदी’

dr.payal tadavi

 

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याबाबत रुग्णालयाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी देण्यास तूर्त नकार दिला आहे.

 

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणात डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल व भक्ती मेहर या तिघी आरोपी असून, त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जामीन देताना नायर रुग्णालयात कधीही न जाण्याची अट घातली होती. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे असल्याने नायर रुग्णालयात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी अर्जाद्वारे मागितली होती. त्यावर ‘आरोपींना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही’, असे निरीक्षण न्यायमूर्ती साधना जाधव यांनी नोंदवून या तिघींना नायर रुग्णालयातच अन्य एखाद्या विभागात पोस्टिंग देऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू दिले जाऊ शकते का?, याची माहिती देण्यासाठी स्त्री रोग विभागाच्या प्रमुखांना न्यायालयात बोलावले होते. परंतू रुग्णालयात काही प्रतिक्रिया उमटल्या किंवा आरोपींना काही झाल्यास त्याची जबाबदारी रुग्णालयावर नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांतर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना नायर रुग्णालयात शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास नकार दिला.

Protected Content