मुंबई (वृत्तसंस्था) जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी परिसरातील एकूण रुग्ण संख्या ५०० जवळ गेली आहे. धारावीमध्ये आतापर्यंत एकूण 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
धारावी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता ५०० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. काल एका दिवसात तब्बल ८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वरळीनंतर आता धारावी परिसर सर्वाधिक संवेदनशील विभाग बनला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज (3 मे) 38 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा 496 वर पोहोचला आहे. यातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे.