माजी आमदाराला उमेदवारी डावलल्याने रा.काँ. प्रदेशाध्यक्षांना रक्ताने पत्र

WhatsApp Image 2019 10 06 at 1.57.31 PM 1

औरंगाबाद प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलल्याने एक कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र लिहीले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात राहणारा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता असून युवराज चावरे असे रक्ताने पत्र लिहिणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. युवराजने लिहिलेल्या या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी नाराज झालेल्या युवराजने रक्ताने जयंत पाटील यांना पत्र लिहिले आहे.

गेल्या 20 वर्षांपासून या पैठण तालुक्यात संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादी जिवंत ठेवली. त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पवारसाहेब, अजितदादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या पुढे कधीही न गेलेले संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का? असा प्रश्नही युवराजने उपस्थित केला आहे.

या करिता हे रक्तरंजित पत्र लिहीत आहे. साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात पक्ष उमेदवार गेल्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. अशा आशयाचे पत्र युवराज चावरे या कार्यकर्त्याने लिहिले आहे. दरम्यान त्याच्या या पत्रावर पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत.

Protected Content