धामणगाव बढे ग्रामपंचायतीने राबविला ‘एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी’चा उपक्रम

धामणगाव बढे (प्रतिनिधी) । येथील ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता करण्यासाठी  एक दीवस माझ्या गावासाठी” गावाच्या स्वच्छतेसाठी, रविवार माझा हक्काचा स्वच्छतेच्या श्रमदानाचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

राष्ट्र संत गाडगे महाराज यांनी अंगिकृत केलेल्या गावा गावात जावुन हातात खराटा ( झाडु )स्वता हातात घेत गावातील केरकचरा साफ करत  ग्राम स्वच्छतेचा मंत्र देत.  ग्रामपंचायतीच्या कारभारातील कारभारी मुस्लीम महिला सरपंच जिनत परवेज कुरेशी यांचे पती शेख अलीम कुरेशी, उपसरपंच श्यामराव पाटील निमखेडे, सदस्य ॲड. वसिम कुरेशी, मौलाना सादीक शेख, रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक ग्रामपंचायत सदस्य रशीद पटेल, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष ओमप्रकाश बोर्डे, सहकारी सदस्य लक्ष्मण गवई, भास्कर हीवाळे यांनी  “एक दीवस माझ्या गावासाठी” गावाच्या स्वच्छतेसाठी, रविवार माझा हक्काचा स्वच्छतेच्या श्रमदानाचा हा अभिनव उपक्रम राबवुन ग्राम स्वच्छतेचा धडा गिरवत आहे.

गावातील मुख्य रस्त्यांवर आणि रहदारीच्या परीसरात नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर कचरा कुंडीत टाकण्याचे सांगूनही बाहेरच कचऱ्याचे ढिग साचला आहे. अशा जागेवर सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी स्वत: हातात झाडु घेत साफसफाई करुन त्या जागेत नागरीकांना बसण्यासाठी सिंमेटचे बाकडे बसवले. या परिसरात स्वच्छता झाल्याने नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे. तर काही नागरीक या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहे.

Protected Content