धान्य खरेदीत विलंब ; भाजपतर्फे सोमवारी आंदोलन

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतक-यांनी मका व ज्वारी शासनाला विक्रीसाठी ऑनलाइन नंबर लावुन २० दिवस उलटूनही निव्वळ निष्काळजीपणामुळे भरड धान्य खरेदीला उशीर होत असल्याचा आरोप भाजपा उत्तर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष सुरेश धनके यांनी केला आहे. याबाबत भाजपातर्फे सोमवारी आंदोलन देखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कालपर्यंत खरेदी विक्री संघातर्फे ३०० शेतक-यांचे नाव आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स तहसिल प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. तर आम्हाला आधिच नावे मागितले असते तर आम्ही कधीचेच दिले असते असे विनोद चौधरी यांनी सांगितले. तर ऑनलाइन शेतक-यांचे नावे महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाले असून खरेदी विक्री संघाला सोमवारी शेतकर-यांचे धान्य खरेदीसाठी गोडावुन महसूल प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Protected Content