धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून होमगार्ड यांना अपघात विमा, मेडीकल विमा यांच्यासह मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज योजना सुविधा मिळण्याची मागणी महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. त्या अनुषांगाने धरणगाव येथील होमागार्डस बांधवांसाठी सुविधा उपलब्ध होण्यासाठी एचडीएफसी बँकेत खाते वर्ग करण्यात येत आहे.

होमागार्ड संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गवळी, प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव आणि केंद्र प्रमुख संदीप तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २ हजार २५० होमगार्ड यांचे एचडीएफसी बँकेत खाते वर्ग करण्यात येत आहे. या माध्यमातून एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक सुविधा मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी धरणगाव तालुका समादेशक ईश्वर महाजन, क्लर्क जानकीराम पाटील, अशोक देशमुख, स्वप्निल जैन, अरूण सातपुते, प्रताप वराडे, भिकन लोहार यांच्यासह होमगार्डस उपस्थित होते.