वेगवेगळ्या घटनेतील अत्यावस्थ असलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

suside

 

जळगाव प्रतिनिधी | वेगवेगळ्या घटनेतील अत्यावस्थ असलेल्या दोघांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात भुसावळातील एका वृद्धाचा तर धरणगाव तालुक्यातील तरुणाचा समावेश असून जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भालचंद्र शिरनामे (वय 52, रा.साईबाबा मंदिर समोर भुसावळ) यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिली होती. ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता घडली होती. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिराजदार यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा तेजस, मुलगी चैताली व पत्नी मनीषा असा परिवार आहे.

 

दुसऱ्या घटनेतील संदीप भालचंद्र कोळी (वय 31 रा.बांभोरी ता. धरणगाव) या तरुणाने 20 ऑगस्ट रोजी आजाराला कंटाळून दुपारी राहत्या घरात कोणीही नसताना विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तरुणाला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 7 : 45 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई वडील, भाऊ, 3 बहिणी असा परिवार आहे.

Protected Content