धरणगाव तालुक्यात आज ३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज (शनिवार) प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा ३ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आनोरे,साळवा आणि वराड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज (शनिवार) प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात आनोरे,साळवा आणि वराड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३२६ झाली आहे. तर साधारण १०० रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २१ जण मयत झाले आहेत. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content