धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका रेशन दुकानांवर तोबा गर्दी झाल्याची माहिती मिळताच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत फिजिकल डिस्टंगसिंग महत्व समजावून सांगीतले. यानंतर धान्य वितरण सुरळीत सुरु झाल्यामुळे रेशन दुकानदारानेही नगराध्यक्ष श्री.चौधरींचे आभार मानले.
कोरोना संकटामुळे लॉकडाऊनमध्ये जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्ध करून दिले आहे. यामुळे रेशन दुकानांवर तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे आज लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी थेट शहरातील एका रेशन दुकानावर जात नागरिकांशी संवाद साधला. धान्य घेतांना सर्वांनी फिजिकल डिस्टंगसिंग पाळावी. तसेच धान्य वितरणची ठरवून देण्यात आलेल्या वेळेबाबत नागरिकांना माहिती दिली.
शहरातील खात्री गल्लीतील ओस्तवाल रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. याठिकाणी फिजिकल डिस्टंगसिंगचे उल्लंघन होत असल्याची माहिती निलेश चौधरी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आपले शहर आधीच कोरानाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियम पाळणे महत्वाचे आहे. धान्य घेण्यासाठी वेळ निश्चित करून करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपापल्या वेळेतच लाभार्थी नागरिकांनी दुकानावर यावे. एकाच वेळी सर्वांनी गर्दी करू नये. यामुळे दुकानावर नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि प्रत्येकाला फिजिकल डिस्टंगसिंगचा नियम पाळत धान्य मिळेल, असे नागरिकांना समजावून सांगितले. यानंतर रेशन वितरण सुरळीत सुरु झाले. तर नगराध्यक्ष आल्यामुळे दुकानदारानेही त्यांचे आभार मानले. दरम्यान, प्रांतधिकारी श्री. गोसावी साहेब, तहसीलदार नितिन कुमार देवरे, नायब तहसीलदार मोहड साहेब हे उत्कृष्ट काम करत असल्यामुळे प्रशासकीय कामात मदत असल्यामुळे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सर्वांचे नागरिकांसमोर आभार मानले.