धरणगाव प्रतिनिधी । येथील बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाकडून आज रथ उत्सवानिमित्त रात्री होणाऱ्या श्री बालाजी महाराज्यांच्या आरतीचा मान कैकाडी समाज पंच मंडळाला देण्यात आला.
या प्रसंगी कैकाडी समाज आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळू भाऊ जाधव, नंदकिशोर जाधव, संतोष गायकवाड, देविदास जाधव, शाम गायकवाड, सागर गायकवाड, रेखा जाधव, मनीषा नंदकिशोर जाधव, इंदुबाई गायकवाड, मनीषा जाधव, रेखा प्रकाश जाधव, प्रकाश रामदास जाधव यांच्याहस्ते श्रीमद् बालाजी भगवानची आरती करण्यात आली. या प्रसंगी कैकाडी समजा सारख्या वंचित समाजाचा सन्मान केल्या बद्दल बालुभाऊ जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त करून मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री डी.आर.पाटील सर उपाध्यक्ष श्री गुलाबराव वाघ,प्रशांत वाणी,किरणभाऊ वाणी,मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते.