धनाजी नाना विदयालयाचे समुहगान व श्लोक पाठांतर स्पर्धेत यश

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाचे समुहगान व श्लोक पाठांतर स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

धनाजी नाना विदयालयाने विदयार्थी समुहगीत व दहा रागात दहा श्लोक पाठांतर या दोन स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.या दोन्हिही स्पर्धेत विदयालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. ही स्पर्धा नाशिक, मराठवाडा व खान्देश या भागातून घेण्यात आली होती. मातृ मंदिर विश्वस्त संस्था, पुणे मार्फत दरवर्षी राज्यस्तरीय विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. यावर्षीही विदयार्थी समुहगीत, श्लोक पाठातंर,अध्यापक समुहगीत,सूर्यनमस्कार अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धेचे मंगळवारी 7 जानेवारी 2023 मातृमंदीर विश्वस्त संस्था,पुणे येथील नितीन सावंत तसेच बाहेरील प्राणेशजी पोरे व इतर दोन तज्ञ परिक्षकांनी प्रत्यक्ष व व्हिडिओ शुटिंगद्वारे परीक्षण केले होते.या स्पर्धेचा निकाल 6 फेब्रुवारी जाहीर झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता.यात धनाजी नाना विदयालयातील विदयार्थी समुग गीताचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक आला. स्पर्धेसाठी संगीत शिक्षिका कल्पना गावंडे,पंकज वानखेडे यांनी जगी घुमवारे हे समुहगीत व 10 रागात 10 मनाचे श्लोक विदयार्थ्यांचे बसवून उत्तम अशी तयारी करुन घेतली होती.

या स्पर्धेत यशस्वी झाल्यानिमित्त सर्व विद्यार्थी, संगीत शिक्षक कल्पना गावंडे, पंकज वानखेडे, मुख्याध्यापिका मनिषा महाजन, पर्यवेक्षक आर.डी.पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष आ.शिरीष चौधरी, सचिव मा. प्रभातदादा चौधरी , संचालक मा.तुकाराम बोरोले तसेच युवा नेते धनंजय भाऊ चौधरी यांनी अभिनंदन केले. यापूर्वीही विदयार्थी समूहगीत व अध्यापक समूहगीतात विदयालयाने राज्यस्तरीय यश मिळविले होते. आजच्या यशाने विदयालयाने संगीत क्षेत्रातील उत्तुंग झेप घेण्याची परंपरा कायम ठेवल्याने परिसरातून अभिनंदन होत आहे.

Protected Content