आधी अपात्रतेचा निकाल लावा ! : उध्दव ठाकरे यांची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी फुटीर गटाच्या अपात्रतेचा निकाल आधी लाऊन नंतरच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या मालकीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेचे काय होणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्हीकडून दावे, वाद, प्रतिवाद झाला आहे. आयोगाने ३० तारखेला दोन्ही बाजूला लिखित आदेश देण्यास सांगितले आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, गद्दारांच्या गटाच्या अपात्रतेचा निकाल आधी लागावा असे अपेक्षित आहे. यानंतरच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या मालकीबाबत निर्णय द्यावा, घटनातज्ज्ञांचेही तेच मत असल्याचे ठाकरे म्हणाले. तर आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Protected Content