रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राभर धनगर समाजाच्या वेग-वेगळ्या समस्या प्रलंबित असुन यासह मेंढपाळानां चराईत येणाऱ्या अडचणीसाठी धनगर समाजाने एकत्र येऊन अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला जास्तीत-जास्त संखेने उपस्थित राहण्याचे अवाहन धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्रा अध्यक्ष संतोष महात्मे यांनी केले आहे.
रावेर येथे शासकीय विश्रामगृह येथे धनगर समाजाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजपा उत्तर महाराष्ट्रा किसान मोर्चा प्रमुख सुरेश धनके, धनगर समाज संघर्ष समिती युवामोर्चा प्रदेशध्यक्ष संदीप सावळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, कृषी उपन्न बाजार समिती संचालक जयेश कुयटे, धनगर संघर्ष समिती मेंढपाळ आघाडी जिल्हाध्यक्ष गोपाळ चौरामुळे, धनगर समाज महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष हीलाल सोनवणे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाउपाध्यक्ष लखन सावळे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सोनवणे, सुभम नमायते स्वप्निल लासुरे, चिंढा भाऊ, गोपाळ चोरमले, पुना कोळपे, देवलाल बाविस्कर यांच्यासह मोठ्या संखेने धनगर समाज बांधव उपस्थित होते.