जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्यातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ हजाराची मदत

यावल प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ हजार रूपयांची मदत केली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या वतीने नागरिकांचे आरोग्य विषयी युद्धपातळीवर काळजी घेतली जाणार असून शासकीय पातळीवर याची योग्य ती अंमलबजावणी होताना दिसत असून याच पार्श्वभूमीवर जि.प. सदस्य व काँग्रेस कमिटीचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यात येत आहे.

सध्या संपूर्ण देश हा कोरोना सारख्या अत्यंत घातक संसर्गजन्य आजाराच्या विळख्यात सापडला असून देशातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने समाजहित देशहितासाठी कार्य करीत आहे. आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतले असल्याचे त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितले.यावेळी आपण आपल्या स्वखर्चाने तालुक्यातील बामनोद आमोदा न्हावी मारूळ पिंपरुड म्हैसवाडी विरोदा या गावातील प्रत्येक घरात व काही छोट्या व्यवसायिकांना मास्क सेनीटायझर साबण इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कोरोना या संकटसमयी रावेर विधानसभेचे आमदार शिरीषदादा चौधरी यांना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने मिळालेल्या पन्नास लाख रुपयांचा निधी त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर कशा स्वरूपात खर्च केले. याबाबतची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

Protected Content