धक्कादायक : लग्नाच्या हॉलमध्ये चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

2rapecase 56 1 300x169

 

यवतमाळ (वृत्तसंस्था) लग्न समारंभाला आलेल्या चिमुकलीवर हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

 

यवतमाळमधील दारव्हा रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये लग्न समारंभ होता. या लग्नाला दहा वर्षांची चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. चिमुरडी हॉलमध्ये फिरत असतानाच आरोपी सफाई कामगार अक्षय चांदेकर तिचा पाठलाग करत तिच्याजवळ पोहचला. अक्षयने तिला खाऊचे आमिष दाखवले. मात्र चिमुरडीने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने तिला जबरदस्ती उचलून एकांतात नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भेदरलेल्या चिमुरडीने आरोपीच्या तावडीतून निसटत पळ काढला. हा सर्व प्रकार हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपी अक्षय चांदेकरला ताब्यात घेतले आहे.

Protected Content