धक्कादायक: रावेर तालुक्यात आठ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील आठ संशयित रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे दुजोरा दिला असून आढळून आलेल्या रूग्णांचे वास्तव्य असलेला परिसर सील करण्याचे काम प्रशासनाने सुरु केल आहे.

रावेर तालुक्यात आत्तार्पंत २१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यात आता आठ रूग्णांची भर पडली असून आता एकुण २९ रूग्ण झाले आहे. यातील आठ जणांचा मृत्यू झालाय.आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये रावेर शहरातील ३, खानापुर १ तर सावद्यात ४ कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यामुळे रावेर तालुक्यात प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. आता तालुक्याची चिंता वाढली असून तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी पॉझिटीव्ह रुग्णाच्या रहिवासी भाग आता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर या भागातील परिसरात फवारणी करण्यात आली आहे. तसेच सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी आणि खानापूर येथी गटविकास अधिकारी डॉ. नाकाडे यांना सुचना देण्यात आले आहेत.

Protected Content