कोरोना : ‘त्या’ दोन रुग्णांची रुग्णालयातून सुटका !

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे मराठी नव्या वर्षाची त्यांची सुरुवात चांगली ठरली आहे. दरम्यान, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्वस्थ असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दोन रुग्णांना काही वेळापूर्वीच नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ९ मार्च रोजी या दोघांना नायडू रुग्णालयात आणले होते. हे दाम्पत्य दुबईहून पुण्यात आले होते. ते करोना पॉझिटिव्ह ठरले होते. मात्र दोन वेळा त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली. या दाम्पत्याला आज सुटका करण्यात आली. दरम्यान, दुबईला पर्यटनासाठी गेलेले ४० जणांचे पथक एक मार्चला मुंबईला परतले. पुण्यातील एकाला त्रास झाल्याने आठ मार्चला रुग्णालयात दाखल केले. ते आणि त्यांची पत्नी या दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना होळीच्या दिवशी नऊ मार्चला नायडू रुग्णालयात दाखल केले. त्या दाम्पत्याची मुलगी, त्यांचा वाहनचालक, एक सहप्रवासी यांना १० मार्चला रुग्णालयात दाखल केले.

Protected Content