चेन्नई (वृत्तसंस्था) मोबाईलच्या स्फोटात आईसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. मुथूलक्ष्मी (२९) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुथूलक्ष्मी यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि यावेळी त्या मोबाईलवरही बोलत होत्या. थोड्यावेळाने मोबाईल ठेवल्यानंतर अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. यावेळी मुथूलक्ष्मी यांच्यासह तीन वर्षीय रणजीत आणि दोन वर्षाचा दक्षितही सोबत होता. स्फोटामध्ये हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.