जुनागड येथे दोन मजली इमारत कोसळली; बचाव पथक घटनास्थळी दाखल

जुनागड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  गुजरातच्या जुनागड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे जुनागडमध्ये दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत १० ते १२  जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने बचाव पथकाची टीम घटानस्थळी दाखल झाली आहे.  संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

संबंधित घटना ही सोमवारी २४ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.  संबंधित इमारत ही बाजार परिसरात होती. त्या परिसरात बाजार भरतो. त्यामुळे संबंधित परिसर प्रचंड रहदारीचा आहे. याशिवाय इमारतीच्या तळमजल्यावर दुकानं होती तर मागच्या बाजूला घरं होती. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांमध्ये दुकानदार आणि दुकानात असलेल्या ग्राहकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळोी बचाव कार्य सुरु आहे.

 

बचावकार्यसाठी आता घटनास्थळी एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आहे. जुनागडमध्ये पूर परिस्थिती असल्याने एनडीआरएफची पथकं आधीपासूनच तैनात आहेत. त्यामुळे संबंधित घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे.

Protected Content