दांड्या बहाद्दर कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ – उपविभागीय अधिकारी

vinay gosavi

एरंडोल प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.१) रोजी येथे पाटील महाविद्यालयात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ७९ कर्मचाऱ्यांनी दांड्या मारल्या. या दांड्या बहाद्दर कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणुक निर्णयाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दा.दि.शं. पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात एरंडोल विधानसभा मतदार संघातील विधानसभा निवडणुकीसाठी एकुण १५१७ कर्माचा-यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी विविध शासकीय व निमशासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना पुर्व सुचना देण्यात आल्या असून ७९ कर्मचारी प्रशिक्षण वर्गास गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात येणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे. यावेळी विविध कर्मचाऱ्यांसह तहसीलदार अर्चना खेतमाळीस उपस्थितीत होत्या.

Protected Content