धरणगाव प्रतिनिधी । आरोग्य विभागाने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून त्यात आठ रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. आढळून आलेले सर्व रूग्ण शहरातील असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.
धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सायंकाळी तपासणी अहवाल प्रशासनाला आठ रूग्ण बाधित आल्याचे आढळून आले आहे. आढळून आलेले रूग्ण शहरातील चिंतामण मोरया परिसर आणि मराठे गल्लीतील आहेत. सोमवारी रात्री उशीरापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३ पर्यंत होती आज त्यात आठ रूग्णांची भर पडली असून एकुण आकडा ५१ वर पोहचली आहे. दरम्यान आढळून आलेले रूग्ण हे क्वारंटाईन केलेल्या परिसरातील असून संबंधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. या वृत्ताला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. तालुक्यात बाधितांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. दरम्यान नागरीकांची स्वत:ची काळजी घेत घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.